Tuesday, 20 November 2018

आम्हांला पकडून दाखवं; चोरी करुन चोरट्यांचं पोलिसाला खुलं आव्हान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, कर्जत

 

'आम्हांला पकडून दाखवं', असं खुलं आव्हान देत चोरट्यांनी पोलिसाच्या घरी जबरी चोरी केलीय. कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथे ही धक्कादायक घटना घडलीय.

यावेळी चोरट्यांनी 15 हजार रोख रक्कम, सोने-चांदी आणि एक दुचाकी घेऊन फरार झाले आहेत. पोलीस अधिकारी संग्राम जाधव यांच्या घरी ही चोरी झालीय.

संग्राम जाधव घरी नसताना हा सर्व प्रकार घडला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

'तुझा मुलगा पोलीस आहे, मग तपास लावून दाखव' असं आव्हानचं चोरट्यांनी जाधव कुटुंबियांना दिलं. या प्रकारानंतर चोरट्यांची मजल आता कुठपर्यंत पोहचलीय, याचा अंदाज आपण लाऊ शकतो.

loading...

Top 10 News

राशी भविष्य