Sunday, 18 November 2018

सोशल मिडियावरचा मेसज वाचून ते नाशिकमध्ये आले आणि तिकडेच अडकून पडले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

सोशल मिडियावर अनेकदा फेक मॅसेजेस देखील व्हायरल होत असतात. नाशिकमध्ये लष्कर भरती सुरु असल्याचा असाच एक मॅसेज सोशल मिडियावर व्हायरल झाला.

त्यामुळे राज्यभरातून तरुण मंडळी लष्कर भरतीसाठी रविवारी नाशिकमध्ये आली. मात्र, अशा कुठल्याही प्रकारची भरती नसल्याचं लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर निराश होऊन या तरुणांनी परतीची वाट धरली. परंतु घरी परत जाण्यास पैसे नसल्यानं या मुलांनी नाशिकच्या एका कंपनीत मजुरी केली.

पैसे मिळाल्यावर घरी जाण्यास निघालेल्या या मुलांना आता एसटी संपामुळे घरी परतणही कठीण होऊन बसलंय. सध्या हे सर्व तरुण नाशिकच्या मध्यवर्ती बस स्थानकात अडकलेत. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य