Tuesday, 20 November 2018

...'त्या' कांदा व्यापाऱ्यांचे दुबई, अरब राष्ट्रांशी लागेबंध, आयकर विभागाच्या तपासात धक्कादायक खुलासा !

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांबाबत आयकर विभागाच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांवर लवकरच अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई होण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने मारलेल्या छाप्यात कांद्याची दुबई आणि अरब राष्ट्रांत अवैधरित्या निर्यात केली जात असल्याचा खुलासा झाला आहे.

 

कांदा व्यापारी कोट्यवधी रुपयांची रोकड हवाला मार्फत पाठवत असल्याची संशयास्पद कागदपत्र समोर आली आहेत. काही व्यापारी शेतक-यांना पैसे न देता बार्टर पद्धतीने लुटत असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. कांदा व्यापारांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचे तसेच  व्यापाऱ्यांची नाशिकसह इतर ठिकाणी आलिशान घरे आणि हॉटेल्स असल्याचा खुलासा झाला आहे.  

 

नाशिकमध्ये कांदा साठवणूक आणि काळाबाजार सुरु असल्याचे समजताच आयकर विभागाने सात बड्या कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकले होते. त्यानंतर ही सर्व धक्कादायक माहिती समोर आली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य