Monday, 21 January 2019

नवजात बालकांचा जीव धोक्यात; एकाच पेटीत तीन ते चार बालकांवर उपचार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याअभावी निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण, आता नाशिकमध्ये असेच बालमृत्यू होण्याची वाट सरकार बघतंय का

असाच प्रश्न निर्माण झाला आहे. कारण नाशिकचं जिल्हा रुग्णालय सध्या व्हेंटिलेटरवर दिसत आहे.

 

नवजात बालकांसाठी काचेच्या पेट्या म्हणजेच इनक्युबेटरचा प्रचंड तुटवडा जिल्हा रुग्णालयात दिसतोय. नवजात बालकांना आवश्यकतेनुसार आठवडाभर किंवा दोन

महिन्यांपर्यंत या इनक्युबेटरमध्ये ठेवलं जातं. ही बालकं बाहेरच्या तापमानात तग धरु शकत नाही. त्यामुळेच इनक्युबेटरमध्ये ठेऊन त्यांच्या शरिराचं तापमान राखलं

जाते.

 

पण, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एकाच पेटीत तीन ते चार बालकांवर उपचार करण्यात येत आहे. रुग्णालयात 18 नवजात बालकांसाठी व्यवस्था असताना इथं 58

नवजात बालकांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे ही नवजात बालकं दगावली तर काय असाच संतप्त सवाल निर्माण होत आहे. खासगी रुग्णालयात इनक्युटेबरचा खर्च

परवडणारा नाही. कारण काचेच्या पेटीसाठी दिवसाला 8 ते 10 हजार रुपये मोजावे लागतात. गरिब नागरिकांना हा खर्च परवडणारा नाही. 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य