Tuesday, 22 January 2019

लटकत्या घुबडाला जीवनदान...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
 
चायना मांज्यामुळे होणा-या दुर्घटनांचे प्रकार आपण नेहमीच ऐकतो आणि पाहतो. पतंग उडविणे हा मौजमजेचा खेळ असला तरी त्याला असलेल्या घातक चायना मेड मांजामुळे तो आपत्ती ठरत आहे. हा चायनामेड मांजा पक्षी-प्राण्यांच्या जीवावर बेतत आहे. 
 
संक्रांतीनिमित्त उडवल्या जाणा-या पतंगांच्या मांज्याची संक्रांत पक्ष्यांवर आली आहे. मांजा पक्षांच्या पायात अडकून दोर बांधल्याप्रमाणे पक्षी जखडले जातात. तोच मांजा मानेत अडकून त्यांना गळफासही बसतो.
 
या चायना मांजा मुळे असंख्य दुर्घटना घडत असताना त्यामुळे काहींचे जीवही गेले आहेत परंतु पंतग उडवीत असताना हा मांजा वायर मध्ये अडकून राहिल्याने त्याचा त्रास पक्षांना सुध्दा होत आहे.
 
सध्या एका बिल्डिंगवरून दुस-या बिल्डिंगवर केबलच्या वायर सोडलेल्या असतात. त्या केबलना अडकलेल्या मांजामध्ये पक्षी अडकून ते फासावर लटकलेल्या अवस्थेत असतात. मोटरसायकलस्वारांच्या मानेत गुरफटल्याने मांजामुळे त्यांच्या जीवावर बेतण्याची पाळी येते.
 
भिवंडी शहरातील काप आळी येथील एका घरावरून गेलेल्या केबल वायर मधील अशाच चायना मांजा मध्ये रात्रीच्या सुमारास घुबड अडकून उलटे लडकून होते. ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावून या घुबडाची सुटका केली आहे.
 
काय घडलं नेमकं?
 
सकाळ होताच नजीकच्या इमारती मधील डॉ . ललिता मोईली या सकाळी आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभ्या असताना त्यांना कावळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आला असता त्यांच्या निदर्शनास घुबड हा वायर मध्ये लटकत असल्याचे दिसल्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशमनदलाला ही गोष्ट कळविली . त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत चायना मांजामध्ये अडकून  वायर मध्ये उलटा लटकून राहिलेल्या घुबडाची सुरक्षित सुटका करीत त्याला जीवनदान दिले आहे.
 
मांजामुळे दुखापत झालेल्या घटना - 
  • पिंपरी चिंचवडमध्ये पतंगाच्या मांजामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा गळा कापता-कापता वाचलाय.
  • एका तीन वर्षांचा चिमुकल्याचेही प्राण थोडक्यात बचावले. मांजामुळे त्याचा डोळा कापला गेला होता, त्याच्यावर बत्तीस टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली.
  • ज्येष्ठ नागरिकाचा गळा आणि हाताचे बोट कापता-कापता बचावले.
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य