Monday, 21 January 2019

पहिल्या श्रावण सोमवारी महादेव मंदिरात जय भोलेचा गजर....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी सर्वच ठिकाणच्या शिवमंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळतेय. 

  • अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीये.
  • हरिपूरच्या ऐतिहासिक संगमेश्वर मंदिरात  दर्शनासाठी भाविकांची रीघ..
  •  उस्मानाबाद जिल्ह्यातील रामलिंग , वडगाव येथील सिध्देश्वर मंदिर , तुळजापुर येथील मुदगलेश्वर , सोनारी येथील भैरवमंदिर , कळंब येथील वांजरा नदी मधील महादेव मंदिर , तेर येथील महादेव मंदिर , येथे श्रावण सोमवार निमित्त भाविकांची आलोट गर्दी झाली.
  • नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती आज पहाटेपासूनच संपूर्ण देशभरातील भाविक त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले आहेत बारा जोतिर्लिंग पैकी एक अत्यंत महत्वाचा जोतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिराची ओळख आहे त्यामुळे वर्षभर याठिकाणी त्र्यंबक राजाचा दर्शनासाठी भाविक येत असतात.
  • श्रावण महिन्यात मात्र त्र्यंबकेश्वरला विशेष गर्दी असते संपूर्ण महिनाभर याठिकाणी भाविकांची गर्दी लक्षात घेता नाशिक प्रशासनाकडून देखील विशेष खबरदारी घेण्यात आली आहे संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलं आहे तसेच महिनाभर भारनियमन देखील या परिसरातील रद्द करण्यात आली आहे.आरोग्य विभागाकडून एक विशेष पथक या ठिकणी ठेवण्यात आल आहे.
  • सोलापूरचे ग्रामदैवत श्री  शिवयोगी  सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी 
  • रत्नागिरीतील सोमेश्वर तसेच नेतकेश्वर आणि ग्रामदेवतेच्या मंदिरात, सकाळपासूनच भाविकांची गर्दी हिते पाहायला मिळाली.
  • औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळच्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांग 
  • हरहर महादेव , बमबम भोलेनाथ जय घोषात श्री नागनाथाचे भक्तांनी पहिल्या श्रावण सोमवारी हजारो सःख्येने दर्शन घेतले 
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य