Sunday, 20 January 2019

रायगड अपघात : 24 तासांनंतर सर्व मृतदेह सापडले, बचावकार्य थांबवलं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

महाबळेश्वरला पर्यटनासाठी निघालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांच्या मिनी बसचा आंबेनळी चिरेखिंड घाटात झालेल्या अपघातात 30 जणांचा जागीच मृत्यू झाला. 

घटनास्थळी एनडीआरएफ, ट्रेकर्स आणि ग्रामस्थांच्या शोधकार्य  मदतीनं सर्व मृतदेह घाटातून बाहेर काढण्यात आल्यानंतर आता शोधकार्य थांबवण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व मृत कर्मचारी दापोली व चिपळूण तालुक्यात राहणारे आहेत. त्या भागांत शोककळा पसरली आहे. या अपघातात 1 जण बचावल्याने या अपघाताबाबत सर्वांना माहिती मिळाली.

ती एकमेव व्यक्ती अशी होती ज्याच्यासाठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणंण नक्कीचं वावगं ठरणार नाही.

रायगड अपघात अपडेट - 30 मृतदेह बाहेर काढण्यात यश

30 जणांचा मृत्यू अन् बचावला फक्त तो...

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य