Sunday, 18 November 2018

30 जणांचा मृत्यू अन् बचावला फक्त तो...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

महाबळेश्वरला पर्यटनासाठी निघालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची मिनी बस आंबेनळी चिरेखिंड घाटात सकाळी 10.30 च्या सुमारास कोसळली.

या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

या बसमधून एकूण 34 जण प्रवास करत होते. अचानक काळाने घाला घातला आणि एका क्षणातचं होत्याचं नव्हतं झाल मात्र या 34 जणांमध्ये एकमेव व्यक्ती अशी होती ज्याच्यासाठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणंण नक्कीचं वावगं ठरणार नाही.

या अपघातात या 34 जणांमध्ये 1 जण मात्र बचावला हा एकमेव व्यक्ती ज्याच्यामुळे या अपघाताबाबत सर्वांना माहिती मिळाली.

 

कसे वाचले या व्यक्तीचे प्राण

  • प्रकाश सांवत देसाई असे या व्यक्तीचं नाव असून या अपघात 34 जणांपैकी हा एकमेव व्यक्ती बचावला महाबळेश्वरला सहलीला जाण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची मिनी बस सकाळी 6.30 च्या सुमारास निघाली.
  • त्यानंतर आंबेनळी चिरेखिंड घाटातून जात असताना अचानक सकाळी सुमारे 10.30च्या सुमारास ही बस दरीत कोसळली.
  • बस दरीत कोसळत असतानाच प्रकाश सांवत हे बसच्या बाहेर फेकले गेले आणि त्यांना समोर एक फांदी दिसली आणि त्यांनी त्या फांदीला घट्ट धरून ठेवले.
  • आणि एका क्षणातच बस 200 फूट खाली कोसळली.
  • सुदैवाने या 34 जणांपैकी प्रकाश सांवत यांचे प्राण बचावले.
  • यानंतर त्यांनी या अपघाताबाबतची माहिती इतरांना दिली आणि घटनास्थळी मदतकार्य सुरु झाले.
  • अन् प्रकाश सावंत हे मृत्यूच्या दारातून परतले. 

रायगडमध्ये आंबेनळी घाटात बस कोसळली, 33 ठार

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य