Tuesday, 22 January 2019

8 वर्षीय मुलीच्या निर्घूण हत्येप्रकरणी सर्व पक्षीयांनी दिली बंदची हाक...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

आठ वर्षीय दिया जाईलकर या चिमूरडीचे अपहरण करुन तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात उघडकीस आला आहे. वावे या गावांतून दिया ही २५ मे रोजी बेपत्ता झाली होती २९ मे रोजी तिचा मृतदेह घराशेजारील बंद घरात सापडल्याने खळबळ निर्माण झाली आहे. दिया जाईलकर हिच्‍या अपहरण आणि हत्‍याप्रकरणी पोलीसांवर जनतेचा दबाव वाढत चालला आहे. पोलीसांनी शीघ्रगतीने तपास सुरू केला असला तरी अद्याप आरोपी किंवा हत्‍येमागचे कारण यांचा शोध लागलेला नाही.

तपासासाठी नियमित पोलीसांच्‍या 4 पथकांबरोबरच 1 सायबरसेलचे व 1 स्‍थानिक अन्‍वेषण विभाग अशी 6 पथके  तयार करण्‍यात आली असून ते गावातील व अन्‍य संशयितांकडे चौकशी करत आहेत केवळ एकाच अंगाने नाहीतर ही पथके स्‍वतंत्ररित्‍या वेगवेगळया अंगाने तपास करीत आहेत अशी माहिती जिल्‍हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी दिली .

ही हत्‍या राजकीय वादातून झाली असल्‍याचा संशय व्‍यक्‍त होत आहे. स्‍थानिक आमदार भरत गोगावले यांनीही घटनास्‍थळी भेट दिली असून आरोपींचा कसून शोध घ्‍यावा व त्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी त्‍यांनी केली आहे. मोठयांच्‍या राजकारणात या छोटया निरागस बालीकेने कुणाचं काय बिघडवलं होतं असा सवाल त्‍यांनी उपस्थित केला आहे . दरम्‍यान पोलीस तपासाबददल त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केलंय.

वावे या गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक सुरू होती शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी अशा दोन राजकीय पक्षांत वर्चस्वासाठी लढाई सुरू होती. दिया हिची आई बिनविरोध शिवसेना पक्षाकडून नियुक्त झाली होती यामुळे या गावांत राजकीय वाद विकोपाला गेला होता. राजकीय वैमनस्यातूनच दिया हिचे अपहरण करुन तिची हत्या करण्यात आली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.

या प्रकरणी अद्याप पर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेले नाही, घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी माणगांव तालुका बंदची हाक दिल्याने गोरेगांव, माणगांव, निजामपूर, इंदापूर,लोणेरे येथील बाजारपेठा तसेच सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वावे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

दिया हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे.

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य