Sunday, 20 January 2019

#'जय महाराष्ट्र'च्या बातमीचा दणका, 70 वर्षांनंतर तहान अखेर भागली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, रायगड

गेल्या 70 वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या माणगांव तालुक्यातील वडपाले गावाची तहान अखेर भागली आहे. जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर प्रशासनानं याची तातडीनं दखल घेतली आहे. घोटभर पाण्यासाठी मृत्यूला चकवा देऊन पाणी आणणाऱ्या महिलांचं भीषण वास्तव जय महाराष्ट्रच्या बातबी आणि बरंच काही या बुलेटीनच्या माध्यमातून दाखवण्यात आली होती.

ही बातमी दाखवताच प्रशासनाला खडबडून जाग आली. याची गंभीर दखल घेत रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ सूचना दिल्यानंतर माणगांवच्या तहसिलदार उर्मिला पाटील, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर आणि माणगांव प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी यांनी वडपाले गावात भेट दिली.

गावातील विहिरींची पाहणी केल्यानंतर विहिरीत घोटभरही पाणी प्यायला नसल्याचं भीषण वास्तव पाहिल्यानंतर तातडीनं पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून देऊन आठ दिवसांच्या आत प्रलंबित असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेला चालना देण्याचे आश्वासन देण्यातं आलं आहे. तसेच रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी वडपाले प्रश्नांवरती तातडीने बैठक बोलावली आहे.

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य