Friday, 18 January 2019

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपींमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याचा मुलगा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पेण

 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी पेण पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली अहे. यातील एक तरुण हा पेण शहरातील भाजपच्या सरचिटणीस ध्वजासिंग गुरखा यांचा मुलगा आहे.

इयत्ता आठवीत शिकणारी 14 वर्षीय पिडीत मुलगी 24 जानेवारीला दुपारी आपल्या इतर दोन मित्रांसह पेण तालुक्यातील शहापाडा धरण परिसरात फिरण्यासाठी गेली होती. पेणला परतताना जंगल परिसरात करण ध्वजासिंग गुरखा व निलेश शिंदे हे दोघेही मद्यधूंद अवस्थेत होते. यावेळी पिडीत तरुणीसह तिच्या दोन मित्रांना अडवून शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.

करण गुरखा हा पिडीत तरुणीच्या ओळखीचा असल्याने तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र करण व निलेश यांनी या तरुणीला जबरदस्तीने आपल्या ऍक्टिवा गाडीवर बसवून पुन्हा शहापाडा धरण परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

घरी आल्यावर मुलीच्या बदललेल्या स्वभावामुळे तिच्या आईला संशय आला व आईने चौकशी सुरूवात केली. पिडीत मुलीने झालेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्यावर मुलीच्या आईने याप्रकरणी पेण पोलिसात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी भा.द.वि.कलम 376(2)(1), 376(ड), 34, 506 तसेच बालकांचे लैगिक शोषनव संरक्षण अधिनीयम 2012 कलम 6,5 अन्वये आरोपी करण गोरखा व निलेश शिंदे यांना अटक केली आहे.

करण हा पेण शहर भाजपचे सरचिटणीस ध्वजासिंग गुरखा यांचा मुलगा आहे. आरोपी करण व निलेश यांस जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विविध महिला संघटनेकडून होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ महिलांनी पेण नगरपालिका ते पोलीस स्टेशन असा मोर्चा काढला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य