Saturday, 15 December 2018

रत्नागिरीत सापडला राम रहिमचा अवतार; पाटीलबाबाच्या लीला सोशल मीडियावर व्हायरल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

 

आसाराम, राधे माँ, राम रहिम यासारखे भोंदू बाबा, त्यांच्या खोट्या लिला जनतेसमोर येत आहेत. असाच दुसरा बाबा रत्नागिरीमध्ये सापडला आहे. रत्नागिरीतील झरेवाडी येथे राहणारा पाटीलबुवा आणि त्याचा साथीदार जयंत रावराणेंवर महिलेला अश्लील शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी पाटील बाबाला अटक केली आहे.


या बाबाचा झरेवाडीत मठ आहे. स्वत:ला आधुनिक युगातील स्वामी समर्थांचा अवतार असल्याचे नागरिकांना सांगत आहे. गुन्हा दाखल करणारी महिला तिच्या मुलाला आकडीचा आजार असल्याने सप्टेंबर 2016 मध्ये पाटील बुवा यांच्या मठात गेली, यावेळी आरोपी पाटील बुवाने आश्लिल शिवीगाळ केली. यासंबंधी पाटील बुवाच्या साथीदाराला सांगितले असता त्यानेही शिविगाळ केली. यासाठी या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पाटील बुवा याचे कारनामे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर या महिलेने रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य