Thursday, 17 January 2019

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रायगड- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात; संतप्त ग्रामस्थांकडून रास्तारोको.

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 जय महाराष्ट्र न्यूज, रायगड 

 

रायगड- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एका बाईकरायडर तरुणीचा अपघात झाला आहे. सकाळी 9.45 च्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघातात ठाण्याच्या

भाग्यश्री शिंदेचा जागीच मृत्यू झाला.  रायगडच्या तारा गावाजवळ हा अपघात झाला आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले.

 

भाग्यश्री शिंदे ही तरुणी  दुचाकीवरुन पेनहून ठाण्याच्या दिशेने येत होती. रस्ता खराब असल्याने मुंबई गोवा महामार्गावरील युसूफ मेहर अली सेंटरसमोर दुचाकी घसरून ती

रस्त्यावर पडली. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणारा ट्रेलर तिच्या डोक्यावरून गेला आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान मुंबई- गोवा महामार्ग ग्रामस्थांनी तारा गावानजीक रास्ता रोखो आंदोलन करुन  रोखून धरला आहे. रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष

मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी या ग्रामस्थांनी लावून धरली आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य