Wednesday, 21 November 2018

आरक्षणाबाबत राज ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 
आरक्षणाचा उपयोग किती आणि काय होणार?, असा प्रश्न विचारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या विषयाबाबत वेगळंच मत मांडलं आहे.
 
सरकारी शिक्षण संस्थांमधील शिक्षणाच्या संधी आणि सरकारी संस्थांमधील नोकर्यांच्या संधी कमी कमी होत असेल तर आरक्षण मागताय कुठे ? देशभरात सरकारी नोकऱ्या कमी होत असताना आणि खासगी शिक्षणसंस्था आणि खासगी कंपन्यांमधील नोकऱ्या वाढत असताना या आरक्षणाचा काय फायदा असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. 
 
मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे, त्यात काकासाहेब शिंदे हकनाक गेला. सरकार फक्त भावनांशी खेळतंय. ते वस्तुस्थिती मांडायला तयार नाहीत. आरक्षण आणि नोकऱ्यांच्या विषयावर काम सुरू आहे, मी हाक देईन तेव्हा या, असं आवाहनही राज यांनी केलं. 

 

*राज ठाकरे यांचं भाषण - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा , श्री गणेश कला क्रीडा रंगमंच पुणे -

* आरक्षण हे आर्थिक निकषावर दिलं गेलं पाहिजे. जातिनिहाय नाही.
* विश्वनाथ प्रताप सिंग हा अतिशय घाणेरडा पंतप्रधान. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे समाजात विष कालवल गेले.
* सरकारी शिक्षण संस्थांमधील शिक्षणाच्या संधी आणि सरकारी संस्थांमधील नोकर्यांच्या संधी कमी कमी होत असेल तर आरक्षण मागताय कुठे. 
* बाहेरच्या राज्यातील तरुण महाराष्ट्रातील नोकर्या बळकावतायत. 
* आत्ताच सरकार आणि आधीच सरकार आरक्षणावर फक्त राजकारण करतायंत , भावनांशी खेळतायत.
* स्थानिकांना जर रोजगाराच्या संधी मिळणार असतील तर आरक्षणाची गरजच राहणार नाही.
* ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले त्या  महाराष्ट्राच प्रबोधन करण्याची वेळ आलीय.
* शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईमध्ये प्रत्येक जातीचा माणूस स्वराज्यासाठी लढत होता.
* महाराष्ट्राचा यु पी, बिहार किंवा झारखंड करायचाय का ? 
* यु पी मधे अनिल शिदोरे एका ढाब्यावर चहा प्यायला थांबले, तीथला ढाब मालक बाहेर आला आणि पहिला प्रश्न विचारला कौनसे जात के हो.... महाराष्ट्र तुम्हाला असा करायचाय का ?
* नरेंद्र मोदी जगातील कुठलाही नेता आला की मिठी मारतात, मग राहूल गांधींनी एक मिठी तर काय बिघडले.
* पर्युषण काळात जैन मुनी फतवे काढतात की नोन व्हेज खाऊ नका.
* प्रत्येकाशी आपला धर्म घरात ठेवावा. इतरांसाठी फतवे काढू नये. 
* आम्ही गटारीला फतवा काढतो का ?
* अनेक मुसलमान कार्यर्कत्यांना सांगतो की कशाला पाहिजे अजानसाठी लाऊडस्पिकर.
* राम मंदिर नक्की बांधायला पाहिजे पण ते निवडणुकीनंतर. खरं तर सरकार आल्या आल्या बांधायला पाहिजे होते. 
* पुन्हा कोणी काकासाहेब शिंदे बळी जाता कामा नये.
* मल्टीप्लेक्समधे कर्मचार्याने बाचाबाची केली म्हणून किशोर शिंदेने कानाखाली मारली आणि प्रश्न सुटला.
* मल्टीप्लेक्स थिएटरचे मालक भेटायला आले आणि मी काही न बोलताच त्यांनी सगळं मान्य केले.
* त्यावर भाजप आणि शिवसेनेचे नेते म्हणाले की हे आमच्यामुळे झाले, दुसर्याची पोरं कडेवर घेऊन फीरवायला यांना का आवडतं काय माहित ?
loading...

Top 10 News

राशी भविष्य