Friday, 18 January 2019

मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा रद्द...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील आंदोलन मागे घेण्यात आले आहे. राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवत मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पूजा न करुन देण्याचा आंदोलकांनी इशारा दिला होता. मात्र आता वारीचं पावित्र्य राखण्यासाठी आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

राज्यातील सकल मराठा समाजाने गेल्या 4 दिवसांपासून विविध तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. गेल्या 3 दिवसांपासून शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनास आज गालबोट लागल्याचे दिसून आले आहे. मराठा आंदोलक आक्रमक झाले असून एसटी बसेसची तोडफोड करण्यात येत आहे.

जलसंपदामंत्री गिरिष महाजन यांनी मुख्यमंत्री येणार नसल्याची घोषणा मंगळवेढ्यात केली आहे. मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि बार्शी तालुक्यात मराठा समाजातील आंदोलकांनी काही एसटी बसेसची तोडफोड केली आहे. तसेच पंढरपुरात सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातला होता.

संत ज्ञानोबांच्या पालखीचे हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान... 

loading...

Top 10 News

राशी भविष्य