Friday, 18 January 2019

वैयक्तिक वादातून भाजप नगरसेवक बालाजी कांबळेंची हत्या..

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

आळंदी नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर वडमुखवाडीमध्ये धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या कांबळे यांना तातडीने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

यांच्या हत्येचं गूढ आता उकलण्याची चिन्हं दिसत आहेत. 2 महिन्यांपूर्वी बालाजी कांबळे देहू फाटा येथील काळेवाडी झोपडपट्टीत आकाश जाधव आणि शुभम कांबळे याच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते.

त्यावेळी अजय मेटकरी याने दारुच्या नशेत बालाजी कांबळे यांना शिवीगाळ केली होती. यावेळी दोघांमध्ये झटपट झाल्याचंही म्हटलं जातं.

या भांडणानंतर अजय मेटकरीने बघून घेईन, अशी धमकी कांबळेंना दिली होती. त्यामुळे त्यानेचं भांडणाचा राग मनात धरुन नगरसेवक बालाजी कांबळेंची हत्या केली, अशी फिर्याद घोलप यांनी दिघी पोलीसांना दिली आहे. मात्र दिघी पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. 

 

लिफ्टने घेतला बळी, तुम्ही वापरता ती लिफ्ट आहे का सुरक्षित ?

खाकीतला नराधम, लोकांनी दिला चांगलाच चोप...

नागपुरातील खळबळजनक घटना, एकाच कुटुंबातील 5 जणांची निघृणपणे हत्या...

नाझरे धरणात निसर्गाचा अद्भुत चमत्कार, जेजुरी गडाच्या पायऱ्या धबधब्याच्या रुपात

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य