Friday, 18 January 2019

शिरीष कुलकर्णी स्वतःहून आले पोलिसांना शरण, 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णीला गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शिरीष कुलकर्णी स्वतःहून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाले.

शिरीष कुलकर्णी स्वत:ला डीएसके या ब्रँडपासून वेगळ ठरवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील युक्तिवाद ऐकण्यास आम्हाला रस नाही, असं म्हणत आम्ही अटकपूर्व जामीन फेटाळून लावण्याऐवजी तुम्ही तो मागे घ्या आणि पोलिसांना कधीपर्यंत शरण येणार याची 8 जूनपर्यंत हायकोर्टाला माहिती द्या, असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने शिरीष कुलकर्णी यांनी दिले होते.

मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना स्वतःहून पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी दिलेली मुदत आज संपणार होती. अखेर शिरीष कुलकर्णी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. शिरीष कुलकर्णी यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य