Tuesday, 22 January 2019

अप्रत्यक्षपणे शिवसेनेला पवारांचं आमंत्रण...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

मोदी सरकारवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. त्यांना पर्याय हवा आहे. शिवसेना आणि आघाडीची मते एक झाली, तर आगामी काळात भाजपचा पाडाव करता येऊ शकतो, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. अशा प्रकारचं विधान करुन त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला तिसऱ्या आघाडीमध्ये सामील होण्याचं आमंत्रणच दिलं आहे. काल रविवारी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या 19 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे तसेच पक्षाचे खासदार-आमदार या वेळी उपस्थित होते.

एकत्रितपणे लढा दिल्यास समाजातल्या मूठभरांच्या हिताची जपणूक करण्याची भूमिका असणाऱ्या भाजपचा पराभव शक्य आहे. भाजपचा आलेख खाली येतो आहे. देशातल्या दहा निवडणुकांपैकी ९ ठिकाणी त्यांचा पराभव झाला,’ असे त्यांनी सांगितले.

“शेतकरी आत्महत्यांचा विक्रम राज्यात झाला आहे. अशा वेळी तुम्ही काय केले असे आम्हाला विचारले जाते. आम्ही देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एकरकमी ७१ हजार कोटींची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली, असे पवार म्हणाले. ‘३५ हजार कोटींची कर्जमाफी दिल्याचे मुख्यमंत्री सांगतात. वर्ष झाले अजून कर्जमाफी चालू आहे. कारण त्यांची देण्याची नियत नाही,’ असे पवार म्हणाले. नोटबंदी, पेट्रोल-डिझेलची महागाई, शेतमालाच्या घसरत्या किमतींमुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. समाजातला एकही घटक समाधानी नसल्याची टीकाही पवारांनी केली.

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पगडीवर चर्चा अन् भाषणात भुजबळ गहिवरले...

काय बोलणार भुजबळ? भुजबळांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष...

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य