Tuesday, 22 January 2019

कोरेगाव-भीमा प्रकरणात पाच जणांना अटक, सर्वत्र खळबळ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी झालेल्या दंगलीमधील पीडित आणि तिथे राहणारी पूजा सकट हिच्या हत्या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी, या मागणीसाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आलं. तसंच  यावेळी गिरीश बापट यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली.
दरम्यान, पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी पहाटेपासूनच सुरु केलेल्या या कारवाईत एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर धवळे यांना त्यांच्या मुंबईतील गोवंडी येथील घरातून ताब्यात घेतले. तर अँड सुरेंद्र गडलिंग यांना नागपुरातील इंदोरा परिसरातून आणि माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान नागपूर विद्यापीठातील सोमा सेन यांच्या घरीही पोलिसांनी छापेमारी केली असून कारवाई सुरु आहे. आणि त्यांनाही अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर महेश राऊत यांनाही नागपुरातून अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील शनिवारवाड्याजवळ कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरने ३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित एल्गार परिषदेत करण्यात आलेली चिथावणीखोर भाषणे व गाण्यांमुळे भीमा-कोरेगाव दंगल भडकल्याचा आरोप होता. या आयोजनामागे माओवाद्यांचा काही संबंध आहे का याची चाचपणी पुणे पोलिस करत आहेत.
याप्रकरणी काही दिवसांपूर्वी कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथर कार्यकर्त्यांच्या घरीही छापे टाकण्यात आले होते. पुण्याचे सहपोलिस आयुक्त आणि नक्षलविरोधी अभियानाचे माजी पोलिस महानिरिक्षक रविंद्र कदम यांच्या नेतृत्वात ही कारवाई सुरु आहे. 

कोण आहेत अॅड. सुरेंद्र गडलिंग?

  • माओवाद्यांचे खटले लढणारे वकील म्हणून अॅड. सुरेंद्र गडलिंग यांची ओळख आहे.
  • दिल्ली विद्यापीठाचा प्रा. साईबाबासह अनेक नक्षलवादी समर्थक अथवा नेत्यांचे खटले अॅड. गडलिंग यांनीच लढवले आहेत.
  • त्यामुळे ते कायम पोलिस यंत्रणेच्या रडारवर राहिलेले आहेत.

कोण आहेत सोमा सेन ?

  • या नागपूर विद्यापीठाच्या महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत.
  • त्यांचे पती तुषार कांती यांना काही महिन्यांपूर्वी गुजरात पोलिसांनी अटक केली होती.
  • सध्या ते जामीनावर आहेत. सोमा सेन यांच्या घराची आज पुणे पोलिसांनी झडती घेतली.
  • या झडतीमध्ये नेमके काय आढळले, याबद्दल अद्यापही काहीही स्पष्ट झालेले नाही.
  • सोमा सेन या अनेक वर्षांपासून डाव्या चळवळीशी जुळलेल्या आहेत.
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य