Sunday, 20 January 2019

पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी, पुणे महापालिकेचा पुढाकार

Previous Next

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र,पुणे
पाळीव प्राण्यावर घरातल्या एका सदस्यासारखंच प्रेम करतात. त्या प्राण्याच्या मृत्यूचं दु:खही आपला माणूस गमावल्यासारखंच होतं. पण त्यानंतर प्रश्न निर्माण होतो तो, त्या प्राण्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा.
 
छोट्या शहरांमध्ये अशा मृतदेहांना पुरण्याची जागा सहज उपलब्ध होते पण पुण्यासारख्या शहरात मात्र हा प्रश्न बिकट बनतो. नागरिकांची हीच सुविधा लक्षात घेऊन पुणे महापालिकेनं तीन फूट उंचीच्या आतील लहान प्राण्यांच्या दहनासाठी एक स्वतंत्र स्मशानभूमी उभारली आहे. 
 
पुण्यातील नायडू मलनिस्सारण केंद्राच्या आवारात १ कोटी खर्च करून प्राण्यासाठी ही स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. अशा स्वरूपाची स्वतंत्र स्मशानभूमी साकारणारी पुणे महापालिका देशातील पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था ठरल्याचा दावाही पालिकेकडून केला जातोय.

पाळीव प्राण्यांना सांभाळणाऱ्या पुणेकारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लहान प्राण्यांमध्ये मांजर, कुत्रा, डुक्कर यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने हे प्राणी उकिरडय़ावर किंवा कचराकुंडीतही टाकून दिले जायचे. यामुळे ही स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठ्या प्राण्यासाठीही लवकरच अशी व्यवस्था केली जाईल असं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
 
या प्रकल्पाचं काम पुर्ण झालं असून उद्घाटन मात्र अजून झालं नाही. महापालिकेने विद्युतदाहिनी केल्याने याच प्राणी प्रेमीकडूनही कौतुक केलं जातंय. मात्र एवढयावरच न थांबता मोठ्या प्राण्यासाठीही लवकर अशी विद्युतदाहिनी करावी. प्राण्यासाठी चांगलं हॉस्पिटल तयार करावे अशी मागणी केली आहे.
 
पुण्यासारख्या मेट्रो शहरात एकच विद्युतदाहिनी पुरेसी आहे का हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे अजून काही विद्युतदाहिनी करण्याचा आव्हान महापालिकेसमोर आहे.
 
 
 
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य