Thursday, 17 January 2019

'रोड ट्रॅफिक' चिमुरड्याच्या जीवावर बेतली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

कोल्हापुरातील ट्रॅफिक एका चिमुरड्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कार्तिकच्या अन्ननलिकेत शेंगदाणा अडकला. त्यामुळे उपचारासाठी कार्तिकचे वडील अॅम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. रस्त्यातंच कार्तिकला जास्त अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यात अॅम्ब्युलन्सही ट्रॅफिकमध्ये अडकली. यानंतर कार्तिकच्या वडिलांनी इतर वाहनचालकांना रस्ता द्या, माझ्या मुलाला अत्यवस्थ वाटत आहे, अॅम्ब्युलन्सला तरी पुढे जाऊ द्या अशी विनवणी केली. मात्र तरीही कोणीही मदत करण्यासाठी पुढे सरसावला नाही की कोणी वाट करुन दिली नाही. अशा परिस्थिीत अॅम्ब्युलन्स कशीबशी हॉस्पिटलजवळ पोहचली पण तोपर्यंत कार्तिकने आपले प्राण सोडले होते.

   फेसबुकवर ही संपूर्ण दुर्देवी घटना शेअर करुन कार्तिकच्या वडिलांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. अशी वेळ कोणाच्याही वाट्याला येऊ नये तसेच सायरन वाजल्यास अॅम्ब्युलन्सला वाट करुन देणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. कारण कोणावरही अशी परिस्थिती ओढावू शकते, अशी प्रतिक्रिया कार्तिकचे वडील करियाप्पा यांनी दिली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य