Friday, 18 January 2019

पुण्यातल्या 3 अवलियांची हटक्या स्टाइलनं निसर्गाची परिक्रमा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, पुणे

एकीकडे प्रसिद्ध पर्यटन कंपन्या देशात आणि परदेशात विविध सहलींचं आयोजन करत असतात. सध्या सहलींचे प्रकार ही बदलत चालले असून पर्यटकांना नवनव्या पद्धतीनं निसर्गाची परिक्रमा घडवून त्याचसोबत विविध गोष्टींची माहिती करून घेणे अशा सहलींचं आयोजनही केलं जातं. मात्र,यालाच छेद देत पुण्यातील 3 अवलियांनी जगाच्या शेवटच्या टोकापासून ते दक्षिण अमेरिका पर्यंतचा प्रवास आगळावेगळया पद्धतीनं यशस्वीपणे पार केलाय.

जगातील शेवटचे गाव असलेल्या अर्जैटिनामधील उषवाया येथुन दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेस असलेले पुंता गँलिनास हा तब्बल पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास वयाच्या 65 व्या वर्षी पुण्यातील अऩिल दामले,अनंत काकतकर,अरविंद मेंहंदळे यांनी केलाय. हा प्रवास करताना विविध प्रकारचे अनुभव दामले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनुभवायला मिळाले. त्यांच्या या प्रवासात त्यांना नवीन पाच देशाची ओळख झाली. 2आँक्टोबर ते 16नोव्हेंबर 2017 दरम्यान हा प्रवास या तिघांनी केला.अनिल दामले आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ही जिद्द पाहून इंडिया बुक आँफ रेकाँर्डने सुद्धा या प्रवासाची नोंद घेतली आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य