Sunday, 18 November 2018

मनोरुग्ण मुलानं फोडले आईचे डोळे...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, पुणे

स्वतःच्या आईच्या डोळ्यात मनोरुग्ण मुलाने चाकू खुपसून तिचे दोन्ही डोळे फोडल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना चिंचवड, वाल्हेकरवाडी येथे घडली आहे. सुमन सावंत वय 75, असे जखमी झालेल्या वृद्ध आईचे नाव आहे. तर भूपेंद्र सावंत वय 35 असे मनोरुग्ण मुलाचे नाव आहे. भूपेंद्र या प्रकारानंतर घरातून निघून गेलाय.मनोरुग्ण भूपेंद्र याच्यावर येरवडा येथील मनोरुग्णालयात उपचार सुरु होते. मागील काही दिवसांपूर्वी भूपेंद्रला घरी आणले होते. भूपेंद्रचे वडील मुंबईला कामानिमित्त असतात.

दुपारच्या वेळी भूपेंद्रने चाकू घेऊन आईच्या दोन्ही डोळ्यात खुपसला यामध्ये सुमन यांच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाली. शेजा-यांना घटनेची माहिती होताच सुमन यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोरुग्ण मुलाकडून ही चूक झाली असल्याने सुमन यांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिलाय.


loading...

Top 10 News

राशी भविष्य