Thursday, 17 January 2019

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं पेपर अवघड गेल्याने केली आत्महत्या

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, कोल्हापुर

कोल्हापुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं पेपर अवघड गेल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

राहुल परेकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो कोल्हापुरातील तळसंदे इथल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काल (शुक्रवार) त्याचा सीएमपीएस या विषयाचा पेपर होता. मात्र, हा पेपर अवघड गेल्यानं आपण आत्महत्या करत असल्याचं राहुलनं सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे आणि त्याने टाकाळा येथे रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली.

राहुल हा मूळचा सोलापूरचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. दरम्यान, या घटनेची नोंद कोल्हापूर रेल्वे पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य