Wednesday, 16 January 2019

मुख्यमंत्र्यांचं लिंगायत समाजाला आश्वासन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, सोलापूर

भारतात लिंगायत समाजासारखी प्राचीन परंपरा असलेली संस्कृती आहे. ज्या संस्कृतीमुळं देशावर धर्मावर अनेक आक्रमणं झाली मात्र जगदगुरूंच्या देश धर्माबाबतच्या विचारांमुळं समाज एकसंध राहिला. मठ निर्माण झाले, त्यांनी संस्कृती , परंपरा आणि शिक्षणाकडे कल ठेवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

सोलापुरातील वीरतपस्वी मंदिरात, श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या श्री संकल्पसिध्दी कार्यमोहोत्सवादरम्यान वीरशैव लिंगायत संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी लिंगायत समाजाला इतर मागासवर्गीयांच्या सवलती मिळूवन देण्यासाठी राज्य शासन विशेष प्रयत्न करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. त्याच बरोबर बसवेश्वर महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने पावलं उचलणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य