Sunday, 20 January 2019

आषाढी यात्रेपूर्वी होणार टोकन दर्शन सुविधा सुरू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, पंढरपूर

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीच्या आज झालेल्या बैठकीत तिरूपती बालाजीच्या धर्तीवर टोकन दर्शन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी होण्यासाठी भाविकांना आषाढी एकदशी पर्यंत वाट पहावी लागणार आहे. पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पद दर्शनासाठी तास न तास  रांगेत थांबाव लागत, भाविकांचा सगळा वेळ यामध्येच जातो. त्यामुळे आता हा त्रास थांबवण्यासाठी समितीने टोकन दर्शन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये पंढरपूरात बसस्थानक, रेल्वे स्टेशन, आणि प्रमुख ठिकाणी टोकन दर्शन सुविधेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त एजन्सीकडून खिडकी व्यवस्था केली जाईल. भाविक तिथे येऊन आपल्या ओळखपत्राचा वापर करून दर्शनासाठी उपलब्ध वेळ निवडतील, यामुळे दर्शन रांगेत थांबण्याचा त्रास कमी होऊन उरलेला वेळ ते पंढरपूरात पर्यटन आणि खरेदी करू शकतील. टोकन दर्शन सुविधेसाठी पददर्शन, मुख दर्शन अशा पध्दतीने वेगवेगळी टोकन उपलब्ध असतील. यामुळे दर्शनासाठी होणारा काळाबाजार सुध्दा संपणार आहे. 

आषाढी यात्रेपूर्वी पंढरपूरात टोकन दर्शन सुविधा सुरू होणार या निर्णयाच वारकरी मंडळीनी स्वागत केल आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य