Thursday, 17 January 2019

सचिनच्या वाढदिवसानिमित्त सचिनप्रेमी चाहत्याचं अनोख बर्थडे सेलिब्रेशन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, पुणे

तंत्रशुध्द अफलातुन फलंदाजी,  फटकेबाजी करणारा सचिन तेंडुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील एका सचिनप्रेमी राजु गायकवाडने स्वत:जवळ असलेल्या सचिनच्या विविध बावीस हजार संकलित केलेले फोटो नागरिकांना पाहण्यासाठी खुले केले. लहानपणापासुन राजु गायकवाड यांना क्रिकेटची आवड होती शालेय शिक्षण घेत असतानाच सचिनचे क्रिकेटमध्ये नुकतेच पदार्पण झाले होते. तेव्हापासुन सचिनचे विविध फोटो संकलित करण्याचा छंद राजु गायकवाड यांना लागला.

आजही ते सचिनचे फोटोे संकलित करतात. दरवर्षी चोवीस एप्रिलला तब्बल बावीस हजार फोटो नागरिकांना पाहण्यास खुले करतात. पुणे कॅम्प परिसरात राहणारे राजु गायकवाड गेली तीस वर्षे पुणे कॅन्टोनमेंट बँकेत पिग्मी एंजट म्हणुन काम करतात. त्याच्यासोबत त्याच्या दोन मुली ,एक मुलगा यांनाही याची आवड लागल्याने सचिनचे फोटो संकलित करण्यात राजु गायकवाड यांना ते मदत करत असतात.

loading...

Top 10 News

राशी भविष्य