Thursday, 17 January 2019

इलेस्टिकसह स्टंट करणं चिमुरड्याच्या जीवावर बेतलं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, पुणे

सुट्टीच्या काळात आपली मुलं कुठं आणि काय खेळतात याकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला हवं. कारण घरात खेळता खेळता आठ वर्षाच्या मुलाला गळफास लागला आणि यात त्याचा मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवडच्या निगडित आज दुपारी साडे तीनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. नकुल कुलकर्णी असं या मुलाचं नाव होतं. दुपारी घरातील आजी आजोबा हॉलमध्ये बसले होते तेव्हा नकुल आतल्या खोलीत खेळत होता. खुंटीला अडकवलेल्या इलेस्टिक सोबत तो स्टंट करू लागला. याच इलेस्टिकमध्ये गळा फसला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला.

बराच वेळ तो बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दार ठोटावला, तरी ही आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर दाराचे कुलूप तोडण्यात आले, तेव्हा इलेस्टिकमध्ये मृतावस्थेत फसलेला नकुल आढळला. नकुलची काही दिवसांनी मुंज होती. मुंजीचे आमंत्रण देण्यासाठी आई वडील घराबाहेर तर आजी आजोबा घरात उपस्थित होते.

loading...

Top 10 News

राशी भविष्य