Wednesday, 16 January 2019

कोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्युज, पुणे
 
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील पूजा सकट या मुलीचा मृतदेह हा तिच्या घराजवळील विहीरीमध्ये आढळल्याने कोरेगाव भीमा येथे एकच खळबळ उडाली होती. पूजाचे वडील सुरेश सकट यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे 
 
गेल्या 3 ते 4 दिवसापासून पूजा ही राहत्या घराजवळुन बेपत्ता झाली होती. पूजाच्या घरच्या लोकांनी खुप शोधाशोध करुण सुद्धा पूजाचा ठावठिकाना लागत नव्हता, घराजवळून बेपत्ता झाल्याने सकट कुटुंबियांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. पूजाच्या वडिलांनी शिक्रापुर पोलीस ठाण्यामध्ये पूजा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली काल उशिरा शेजारील काही  लोकांना पूजाचा मृतदेह घराजवळ असलेल्या विहीरीमध्ये आढळला दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या पूजाचा मृतदेह विहिरित आढळ्याने एकच गोंधळ उडाला. 
 
पूजाने आत्महत्या केली का कुणी तिचा घात केला हा तपास शिक्रापुर पोलिस करतीलच परंतु या सर्व घटनेकड़े पाहता ही आत्महत्या नसून पूजा हिची हत्या झाल्याचा आरोप पूजाचे वडील सुनील सकट यांनी केला आहे, माझ्या घराजवळील जी मोकळी जागा आहे त्या जागेवर काही लोकांचा नजर आहे त्यामुळे जे लोक आहेत त्याच लोकांनी पूजाचा घात केला असल्याचा दावा पूजाच्या वडील आणि भावाने केला आहे. 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीशी याचा काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा सकट यांनी दिला आहे. याप्रकरणी शिक्रापुर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर 8 ते 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला अाहे. त्यामधील दोन आरोपींना अटक केले असून पुढील तपास सुरु आहे.
loading...

Top 10 News

राशी भविष्य