Sunday, 18 November 2018

'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र हागणदारीमुक्तीच्या घोषणेवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री रस्त्याने नाही तर हेलिकॉप्टरने फिरतात त्यामुळे त्यांना परिस्थिती माहित नसल्याचे नमुद करत त्यांची हि घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे असल्याची टीका त्यांनी केलीय.

मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या आकडेवारीवरदेखील सुप्रिया सुळेंनी प्रश्न उपस्थित केला असून वास्तवात शौचालय आहेत पण पाणी नाहीत अशा शब्दात त्यांनी सरकारला धारेवर धरलंय. पुण्यात तळजाई टेकडी येथे नागरिकांशी विविध प्रश्नांवर संवाद साधताना त्या बोलत होत्या.

loading...

Top 10 News

राशी भविष्य