Saturday, 17 November 2018

बस चालवताना मोबाईल हाताळणाऱ्यांना दंड

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, पुणे

बस चालवित असताना मोबाइलवर बोलणाऱ्या चालकांना दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएल) घेतला आहे. बस चालविताना मोबाइलवर बोलून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांना धडा शिकवण्यासाठी दंड आकारण्यासाठी नियम करण्यात आला आहे. त्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

सर्वप्रथम २००८मध्ये पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष सुब्बराव कदम यांनी चालत्या बसमध्ये मोबाइलवर बोलणाऱ्या चालकास एक हजार रुपयांचा दंड ठोठाविण्याचा निर्णय घेतला होता. प्रवाशांनी मोबाइलवर बोलणाऱ्या चालकाचा फोटो काढून तो पीएमपी प्रशासनाला ई-मेलद्वारे पाठविण्याची सूचना त्यांनी केली. प्रवाशाने पाठविलेल्या फोटोची पडताळणी करून, त्यात तथ्य असल्यास बस चालकाच्या वेतनातून एक हजार रुपये वजा करून ते संबंधित प्रवाशाला दिले जात होते. दंडामुळे बस चालकांनावर काहीअंशी चाप बसला.

मात्र, काही प्रवाशांकडून त्याचा गैरफायदाही घेण्यात आला. ही बाब लक्षात घेऊन प्रवाशाने बसचालकाचे छायाचित्र काढले तरी, त्यास एक हजार रुपयाचे बक्षीस देण्याची योजना बंद केली. त्याऐवजी तो निधी कामगार कल्याण मंडळात जमा केला जात होता. मध्यंतरी एक ते दोन वर्षांपूर्वी योजनेंतर्गत प्रवाशांना बक्षीस दिले जात होते. मात्र, ते पुन्हा बंद करण्यात आले.आता चालकांकडून नियमांचे पालन न करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी मसुदाही तयार करण्यात आलाA आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य