Sunday, 20 January 2019

एमसीएला पाणीपुरवठा करण्यास हायकोर्टाची मनाई

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, पुणे

आयपीएलच्या पुण्यातील मुंबई - कावेरी पाणी विवादानंतर मिळालेल्या धमक्यांमुळे चेन्नई येथून पुण्यात हलवण्यात आलेले आयपीएलचे सामने अडचणीत येण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या सामन्यांसाठी पवना धरणातील पाणी वापरू देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यत मनाई केली आहे.'लोकसत्ता मुव्हमेंट' या सामाजिक संघटनेने दोन वर्षांपूर्वी याप्रकरणी जनहित याचिका करून राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना 'आयपीएल' सामने आयोजित करण्यास विरोध दर्शविला आहे. या याचिकेची न्या. अभय ओक व न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

जानेवारी, २०१२मध्ये झालेल्या करारानुसार केवळ 'उद्योग' या व्याख्येत मोडणाऱ्या क्षेत्रालाच पाणीपुरवठा करण्याची अनुमती करारात देण्यात आली असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. त्यामुळे 'आयपीएल' क्रिकेट हे उद्योग या व्याख्येत येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच याचिकेवर अंतिम निकाल होईपर्यंत राज्य सरकारने पुण्यातील 'आयपीएल' सामन्यांसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) पाणीपुरवठा करण्याविषयी कोणताही निर्णय घेऊ नये, असे सरकारला बजावले आहे. माञ कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून पेटलेल्या वादानंतर चेन्नईतून पुण्यात हलवण्यात आलेल्या आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्जच्या सामन्यांवर आता नवे संकट उभे राहिले आहे. 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य