Tuesday, 22 January 2019

बीडच्या डोंगराळ भागात आढळली ऐतिहासिक मूर्ती,मूर्तीजवळ फणा घालून बसलेला काळा नाग जाणून घ्या काय आहे रहस्य

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

अंबाजोगाई-परळी रस्ता चौपदरी होत असल्याने कन्हेरवाडी गावाशेजारील डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे. साधारण 30 ते 35 फूट खोल डोंगर पोखरल्यानंतर जेसीबी चालकाला मूर्ती दिसली. आणि मूर्ती शेजारी काळा सर्प आढळला. विशेष बाब म्हणजे हा नाग त्या मूर्तीवर फणा काढून बसला होता. या परिसरात या रंगाचा सर्प यापूर्वी कधीच आढळला नाही. तब्बल दोन तास हा नाग फणा काढून त्या मूर्तीवर बसला होता. हे समजताच परिसरातील बघ्यांनी मोठी गर्दी केली.

मूर्ती नेमकी कोणाची आहे हे अद्याप सिद्ध झालेले नाही. तहसीलदार शरद झाडगे यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट दिली. मात्र हा सर्व प्रकार पाहून तेही चक्रावून गेले. मूर्तीचा शोध लावण्यासाठी त्यांनी पुरातत्व विभागाला पाचारण केले आहे. ही मूर्ती हजारो वर्षापूर्वीची असल्याचा तर्क लावला जात आहे. सध्या मूर्तीवरील साप बिळात गेला आहे.

हा चमत्कार असल्याची अफवा परिसरात पसरल्याने तिथेच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून, भक्तांची मोठी रीघ लागली आहे. दरम्यान या परिसरात मंदिर स्थापन करण्यात येणार असून, एका शेतकऱ्याने त्याच्याकडील दोन एकर शेत मंदिराला देण्याची घोषणा केली आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य