Sunday, 18 November 2018

सोलापूर महापालिकेच्या सभेत राडा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोठा राडा झालाय. शिवसेना, काँग्रेस, बसप आणि इतर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी चक्क नगर सचिवांनाच ढकला ढकली केलीय. नगरसचिव कायद्यानुसार काम करत नाहीत. उपसूचना मांडण्याची संधी विरोधकांना देण्याऐवजी सभा तहकूब करण्यास मदत करतात.

आजही समांतर जलवाहिनीच्या मुद्द्यावरून सर्वसाधारण सभेत चर्चा सुरू होती. मात्र, सत्ताधारी भाजपने बहुमत असल्याचे सांगत विषय मंजुर केला. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी नगरसचिव नागेश दंतकाळे यांना यावेळी ढकला ढकली केली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य