Thursday, 17 January 2019

पुणे लोकसभेची जागा लढविणार - अजित पवार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुण्याच्या लोकसभा जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल झालेल्या हल्लाबोल सभेत जाहीर केले होत.यावर राष्ट्रवादी पुण्याची जागा लढवणार असल्यास काँग्रेस बारामतीमधून उमेदवार देणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. याचबाबत प्रश्न विचारला असता 'अरे बापरे!काँग्रेस बारामतीतून लढणार म्हणजे आमचं डिपॉजिटच जप्त होईल' अशी मिश्कील टिप्पणी अजित पवार यांनी केली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये पुण्यातील लोकसभेच्या जागेवर आजवर काँग्रेसकडून उमेदवार दिला जातो. मागील निवडणुकीत भाजप खासदार अनिल शिरोळे यांनी काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने फारकत घेत स्वबळावर निवडणूक लढवली. याचा फटका दोन्ही काँग्रेसला बसला त्यामुळे आगामी निवडणूका एकत्र लढवण्याच्या चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी पुण्याची लोकसभा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या काळात दोन्ही काँग्रेसमध्ये वाद रंगणार आल्याच दिसत आहे.

भाजपचं आजचं उपोषण म्हणजे निव्वळ नौटंकी असल्याची ही यावेळी अजित पवारांनी केली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य