Tuesday, 20 November 2018

पीठाच्या चक्कीत ओढणी अडकून महिलेचा मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पीठाच्या चक्कीत ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यातील गोखलेनगर परिसरात घडलीय. या अपघातादरम्यान, महिलेच्या चेहऱ्याला दुखापत झालीय. सुप्रिया प्रधान असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या 38 वर्षांच्या होत्या. सुप्रिया या पीठाच्या चक्कीजवळ गेल्या असता अचानक त्यांची ओढणी चक्कीत अडकली.

काही क्षणातच त्या चक्कीत ओढल्या गेल्या. त्यामध्ये सुप्रिया यांच्या चेह-याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य