Sunday, 18 November 2018

बिटकॉइनमधून तब्बल 2 कोटींची फसवणूक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

बिटकॉइन योजनेतून अनेकांची कोट्यवधींची फसवणूक करणारे रॅकेट पुणे पोलिसांच्या सायबर सेलने उध्वस्त केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केलीय. तर आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर आहेत. गेन बिटकॉइन या नावाच्या कंपनीमध्ये एका गुंतवणुकीवर दरमहा 0.1 टक्के बिटकॉइन असे 18 महिन्यांत एका बिटकॉइनचे 1.8 बिटकॉइन परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते, मात्र यामध्ये फसवणूक झाल्याची तक्रार 25 नागरिकांनी पोलिसात दिली होती. पुण्यातील दत्तवाडी आणि निगडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सायबर सेल पोलिसांनी सायबर तज्ञांच्या मदतीने या प्रकरणात तपास केला, आतापर्यंत तब्बल 2 कोटी 25 लाख रुपयांपर्यत फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आणि हा फसवणुकीचा आकडा आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये आणखी खूप मोठी टोळी हाती लागण्याची शक्यता असल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य