Wednesday, 16 January 2019

खेळादरम्यान कुस्तीपटू गंभीर जखमी, कोल्हापूरातील धक्कादायक प्रकार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

खेळादरम्यान एखादा खेळाडू जखमी होणे, मृत्यू होणे या घटना मैदानात वारंवार घडताना दिसतात. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील बांदवडे येथे एक कुस्तीपटू कुस्ती खेळताना आखाड्यामध्ये गंभीर जखमी झाला. निलेश विठ्ठल कंदूरकर असे या कुस्तीपटूचे नाव आहे. निलेशला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी सर्वांनी आस लावून धरलीय.

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना पुण्यातल्या शिरुर तालुक्यामध्ये घडली होती. गौरव वेताळे नावाच्या कबड्डीपटू विद्यार्थ्याचा खेळादरम्यान एकाएकी मृत्यू झाला होता. कबड्डी खेळताना अचानक चक्कर आल्यानं त्याला शाळा प्रशासनाने शिक्रापूर येथील माऊलीनाथ मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. खेळाडूंना खेळाची आवड जपता जपता आपली प्रकृती देखील जपणं आता गरजेचे बनले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य