Sunday, 20 January 2019

बारामती वनक्षेत्रात चिंकाऱ्याचा मृत्यू, पार्टीसाठी शिकार केल्याचा वनविभागाचा संशय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, बारामती

बारामती तालुक्यातील कऱ्हावागज परिसरातील वन परिक्षेत्रात चिंकारा हरणाचा संशयास्पद मृत्यू झालाय,तर दुसरीकडे कऱ्हा नदी पात्रात शिकार करून पार्टी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय. ही पार्टी चिंकारा हरणाची शिकार करून केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मात्र, नदीपात्रात झालेल्या पार्टीत नेमके कशाचे मांस वापरण्यात आले, याचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.

कऱ्हा नदीच्या पात्रात वाळू उपसा करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यालगतच चिंकारा जातीच्या हरणाशी मिळती जुळती कवटी, तीन दगडांची चूल, त्यात भाजलेल्या नख्या, कुऱ्हाड, सुरे, दारूच्या बाटल्या, हाडकांचे तुकडे आढळून आले आहेत. त्यामुळे चिंकारा जातीच्या हरणाची शिकार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलेली कवटी आणि इतर अवशेष तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे सहायक वनसंरक्षक वैभव भालेराव यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेचा पंचनामा सुरू असतानाच कऱ्हावागजच्या वनविभागात एका चिंकारा हरणाचा संशयास्पद मृत्यू झालाय.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य