Tuesday, 11 December 2018

पंढरपूरमधील नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, अज्ञातांकडून गोळीबार आणि कोयत्याने वार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

पंढरपूर नगरपालिकेतील नगरसेवकर प्राणघातक हल्ला झाला आहे. संदीप पवार असे नगरसेवकाचे नाव असून त्यांच्यावर अज्ञाताने गोळीबार केला. पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्टेशन रोडवरील श्रीराम हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे.

आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नगरसेवक संदीप पवार हे श्रीराम हॉटेलमध्ये आले. त्यावेळी अचानक दोन अज्ञातांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि कोयत्याने वार केले. या घटनेनंतर त्यांनी तेथून पळ काढला.

या घटनेनंतर पोलिसांनी लगेच तेथे धाव घेतली व पोलिसांच्या मदतीने पवार यांना उपचारासाठी शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर प्रकृतीत सुधार न होता ती गंभीर बनल्याने त्यांना सोलापूर येथे हलवण्यात आले.

दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्यावरुन ते हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या तीन टीम रवाना झाल्या आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य