Tuesday, 11 December 2018

जेजुरीचे आजारी; ग्रामीण रुगालायाची इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

महाराष्ट्रच कुलदैवत असलेले जेजुरी सध्या आजाराच्या छायेत सापडलयं. जेजुरीत येणाऱ्या भाविक्कांसाठी तसेच जेजुरीकर नागरिकांसाठी जेजुरीत ग्रामीण रुग्णालयाची सोय करण्यात आलीय. ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य सुविधेचे धिंडवडे उडत असतांना करोडो रुपये खर्च करून सुसज्ज नवीन इमारत उभारण्यात आली. मात्र, गेले काही महिने ही इमारत तयार असूनही इमारतीचे उदघाटन रखडले आहे.

ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत “रेडी” असूनही प्रशासन मात्र “नॉट रेडी” असल्याचे सांगत आहे. लालफितीच्या कारभारात इमारतीचे उद्घाटन अडकल्याने जेजुरी पंचक्रोशीतील नागरिक मात्र “ व्हेंटिलेटरवर” गेल्याचे चित्र दिसत आहे. तसेच, राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी 31 जानेवारीपर्यत रुग्णालय सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. ते सुद्धा फेल ठरल्याने जेजुरीकर संताप व्यक्त करत आहेत. जेजुरीतील रुग्णांची संख्या, ग्रामीण रुग्णालयाची मर्यादित जागा, विचारात घेता जेजुरीत सुसज्ज ग्रामीण रुगणालय व्हावे या जेजुरीकारांच्या मागणीमुळे जेजुरीत ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत पावणे दोन एकर जागेवर गेल्या वर्षी उभी राहिली. मात्र, वर्ष उलटून गेले तरी उद्घाटन न झाल्यामुळे नवीन इमारतीत रुग्णालय चालू होऊ शकलेले नाही.

जेजुरी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार ज्या इमारतीत सध्या चालवला जातोय ती इमारत मोडकळीस आलीय. या रुग्णालयात अपुऱ्या सोईसुविधांमुळे रुग्णांना पुण्याला हलवावे लागते. संतप्त नागरिकांनी रुग्णालय सुरु होण्यास उशीर का होतोय? असे विचारले असता, पाणी, विजेचा प्रश्न असल्याने रुग्णालय नवीन इमारतीत चालू करायला उशीर होतोय, आम्ही पाठपुरवठा करतोय मात्र, वरिष्ठ पातळीवर सूत्र फिरत नसल्याची अप्रत्यक्ष रित्या कबुली रुग्णालय अधीक्षक डॉ.प्रताप वाघमारे यांनी दिलीय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य