Tuesday, 20 November 2018

चोरट्यांनी चोरीच्या सगळ्या सीमा ओलांडल्या, सांगलीतील घटना

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

सांगली जवळील हरिपूर मधील बागेतील गणपती मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून, गणपतीचे चांदीचे दागिने आणि पूजा साहित्य लंपास केल्याचा प्रकार झाला आहे.

चोरट्यांनी गाभाऱ्यातल्या लोखंडी तिझोरीतील चांदीचे किरीट, अभिषेक पात्र, तांब्या-ताम्हण, चांदीचा उंदीर यांसह गणपतीचे साडेचार किलो चांदीचे दागिने आणि इतर पूजा साहित्य लांबवले.

शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडल्याचा अंदाज नागरीकांकडून व्यक्त होत आहे. पहाटे गणपतीच्या पूजेसाठी तयारी करत असताना पुजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली.

दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. चोरटयांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाचीही मदत घेतली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य