Sunday, 18 November 2018

रॉबिनहूड आणि आप्पा महाराज म्हणून ओळखले जाणारे बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

अन्याय रोखण्यासाठी कायदा हातात घेणारे आणि गोरगरीब जनतेसाठी रॉबिनहूड अशी प्रतिमा असलेले बापू बिरू वाटेगावकर यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बोरगाव, रेठरे, हरणाक्ष, मसुचिवडी, ताकारी परिसरात एकेकाळी त्यांच्या नावानं थरकाप उडायचा. बापू बिरू वाटेगावकर हे ९० वर्षांचे होते. इस्लामपूरच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. 

बापू बिरू वाटेगावकर यांनी, गोरगरीबांवर अन्याय करणारे खासगी सावकार आणि महिलांवर अत्याचार करणारे गुंड यांच्याविरोधात आवाज उठवला. त्यांच्या जीवनावर बापू बिरू नावाचा चित्रपटही निघाला होता. मिलिंद गुणाजी यांनी त्यात बापू बिरूंची व्यक्तिरेखा साकारली होती.

जन्मठेपेची शिक्षा भोगून आल्यानंतर बापू बिरूंनी आध्यात्मिक आणि सामाजिक प्रबोधनाचं काम सुरू केलं. गावोगावी त्यांना व्याख्यानासाठी बोलावलं जायचं. बोरगाव परिसरात महाराज या नावानं ते ओळखले जायचे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

व्हिडीओज् पाहाण्यासाठी...

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य