Thursday, 17 January 2019

तब्बल पन्नास तासाच्या अथक प्रयत्नानंतर 7 वर्षीय ओमची सुटका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पूर्णानगर येथील साईनिवास हौसिंग सोसायटीजवळ राहणाऱ्या  7 वर्षीय ओमला अज्ञात अपहरकर्त्यांनी शनिवारी पळवून नेले होते.

 

घराजवळून नेलेल्या ओमला अपहरणकर्त्याच्या तावडीतून पोलिसांनी सोमवारी सुखरूप परत आणले आहे.

 

टॉवर लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचून या टोळीला गजाआड केले. त्यानंतर ओमला कुटुंबियांच्या ताब्यात दिले. ओमला सुखरूप ताब्यात दिल्यानंतर ओमच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

 

साठ लाखाच्या खंडणीसाठी ओमचे अपहरण करण्यात आले होते. जवळपास पन्नास तास सुरु असलेल्या या फिल्मी स्टाईल अपहरणाचा अखेर अंत झाला आणि ओम सुखरूप कुटुंबियांजवळ पोहोचला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य