Friday, 18 January 2019

...म्हणून त्याने कोरड्या विहिरीत केले होते उपोषण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

शेतकऱ्यांच्या मागची साडेसाती काही संपता संपत नाही आहे. कर्जाच्या ओझ्यापायी शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत. अकोले तालुक्यातील मन्याळे गावातील शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. भैरवनाथ जाधव असं या शेतकऱ्याचं नाव असून मंत्रालयात जाऊन त्यांनी विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

भैरवनाथ जाधव यांनी मे महिन्यात शेतातील कोरड्या विहिरीत बसून उपोषण केले होते. 12 वर्षांपूर्वी त्यांनी यशोमंदिर पतपेढीतून कर्ज घेतले होते मात्र, अजून पर्यंत ते कर्ज फेडू शकले नव्हते. थकीत कर्जाच्या वसूलीसीठी पतसंस्था त्यांचे घर व जमीन जप्त करणार असल्याने भैरवनाथांनी उपोषण केले होते.

 

दरम्यान, त्यावेळी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सहकार मंत्र्यांशी चर्चा करुन यावर काही तरी तोडगा काढू असे  जाधव यांना  आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासन देऊन कित्येक महिने उलटून गेले तरीदेखील कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने शेतक-याने बुधवारी मंत्रालयात विषारी किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य