Wednesday, 23 January 2019

...आणि गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने बहरलं ‘त्या’ दोघांचं प्रेम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

‘प्रेम आंधळ असते; प्रेमाला कसलीच मर्यादा नसते.. ना भाषेची,ना राज्याची ..ना कुठल्याही जात-धर्माची..’ हे तुम्ही अनेकदा सिनेमात पाहिलेच असेल… अशीच एक प्रेमकथा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे…ब्रिटनचा मुलगा आणि इटलीची मुलगी, दोघांनाही एकमेकांची भाषा समजत नव्हती. अशात त्यांनी त्यांचे प्रेम फुलवण्यासाठी गुगल ट्रान्सलेटची मदत घेतली. Chloe Smith आणि Daniele Marosco अशी त्यांची नावे आहेत.

2017 मध्ये पहिल्यांदा त्यांची ओळख झाली होती. दोघांनाही एकमेकांची भाषा समजत नव्हती, पण एकमेकांकडे आकर्षित होते. हळूहळू त्यांना एकमेकांना जाणून घ्यायचे होते. त्यामुळे त्यांनी एकमेकांची भाषा समजून घेण्यासाठी गुगल ट्रान्सलेटची मदत घेतली. दोघेही एकत्रित सिनेमे पाहू लागले, फिरायला गेले शिवाय एकमेंकाच्या कुटुंबासमवेत वेळ घालवला. दोघांच्या परिवारातील लोकही या दोघांच्या नात्याबाबत आश्चर्यचकित झाले आहेत. दोघेही एकमेंकाची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

इटलीच्या Danieleला ब्रिटनची Chloe इंग्रजी शिकवते. तर तो तिला इटालियन भाषा शिकवतोय. सध्या हे दोघेही लंडनमध्ये राहत असून तिथेच नोकरी करत आहेत. Chloe मेकअप आर्टीस्ट आहे तर Daniele हा एका हॉटेलमध्ये काम करतो. पण दोघांनी एकमेकांना वेळ देणे महत्त्वाचं समजले, भाषा अडसर ठरली नाही. आता त्यांनी कोणत्याही भाषेचा क्लास न लावता त्यांचे नाते मजबूत केले आहे. तेही केवळ गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य