Wednesday, 23 January 2019

आता मोबाईलमध्ये ठेवावा लागणार मिनिमम बॅलन्स ?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बँक खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे बंधनकारक करण्यात आल्यानंतर आता टेलिकॉम कंपन्यांनेही हा फंडा वापरायचे ठरवले आहे. म्हणजेच आता प्रिपेड सीमकार्ड वापरणाऱ्या मोबाइलधारकांना सीमकार्ड चालू ठेवण्यासाठी मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे करण्यात येणार आहे. मिनिमम रुपयांचे रिचार्ज करण्यासंदर्भात टेलिकॉम कंपन्या लवकरच मोबाइलधारकांना मेसेज पाठवणे सुरू करणार आहे. मोबाइलधारकांकडे मिनिमम 35 रुपये असणे गरजेचे आहे.

जर मोबाइलमध्ये मिनिमम बॅलेन्स नसेल तर प्रिपेड मोबाइलधारकांचे डिअॅक्टिव्ह करण्यात येवू शकते, असा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. पोस्टपेड युजर्सना हा नियम लागू होणार नाही. कारण ते महिन्यांच्या अखेरला बिलं भरतात. प्रिपेड युजर्ससाठी जवळजवळ सर्वच कंपन्यांनी अनलिमिटेड प्लान लाँच केले आहेत. 1 ते 3 महिने वैधता असलेल्या प्लानसाठी मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे आहे. रिपोर्ट्सनुसार, एअरटेल आणि वोडाफोन युजर्सला कंपनीकडून मेसेज पाठवायला सुरुवात झाली आहे.

या मेसेजमध्ये सांगण्यात आलयं, तुमचा वोडाफोन नंबर बंद केला जावू शकतो. नंबर सुरू ठेवण्यासाठी अनलिमिटेड ऑल राउंडरमधून रिचार्ज करा. ज्यांच्याकडे मिनिमम बॅलन्स नाही, अशा युजर्संना हे मेसेज पाठवले जात आहेत. तसेच एअरटेलने सीमकार्ड चालू ठेवण्यासठी 35 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवला आहे तर वोडाफोनने सीम चालू ठेवण्यासाठी 65 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवला आहे.

कंपनीकडून सलग 15 दिवस मेजेस पाठवण्यात येईल. त्यानंतरही मिनिमम बॅलन्स ठेवला नाही तर कंपनी आउटगोईंग कॉल आणि मोबाइल डेटा बंद करणार आहे. कंपनीच्या मेसेजनंतरही याची दखल घेतली नाही किंवा रिचार्ज केले नाही तर इनकमिंग कॉल्सही कंपनीकडून बंद करण्यात येणार आहे. असे मोबाइल कंपन्यांनी ठरवले आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य