Monday, 10 December 2018

अन् मटणासाठी बापाने केली 4 वर्षीय चिमुरडीची हत्या

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बिहारमध्ये मटण न मिळाल्याच्या कारणावरुन आपल्या 4 वर्षीय चिमुरडीला मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या 4 वर्षाच्या एकुलत्या एक मुलीची हत्या केली आहे. कारण काय तर त्याच्या बायकोने मटण बनवायला खूप वेळ लावला. बुधवारी सायंकाळी बिहारमधील अमोर पोलीस ठाण्याजवळील फकीरौली गावात ही घटना घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि 40 वर्षीय शंभू लाल शर्मा या आरोपीला अटक करण्यात आली. मुलीच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले गेले. ताब्यात घेण्याआधी आरोपीची चौकशी केली असता तो दुःखी होता, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पत्नीने तक्रार केल्यानंतर शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमकं प्रकरण काय आहे ?

  • आरोपी शंभु शर्मा हा गुजरातमध्ये मजुरीची कामं करतो आणि छठ पूजेनिमित्त तो घरी परतला होता.
  • त्याला मटणाची प्रचंड आवड आहे. त्यामुळे बायकोने मटण बनवण्यास वेळ लावल्या कारणाने त्याचा राग अनावर झाला आणि रागाच्या भरात तो त्याच्या 4 वर्षीय मुलीला मारहाण करू लागला.
  • मुलगी शांत झाली आणि जमीनीवर बेशुध्द पडल्यावर त्याला त्याच्या कृत्याची जाणीव झाली. शंभू शर्माने आपल्या मुलीला तातडीने रुग्णालयात नेले मात्र रुग्णालयात नेल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले.
  • त्यानंतर तो घाबरला आणि स्वतःच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये सोडून पळाला.
  • पण पोलिसांनी त्याला शोधले आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

या घटनेनंतर स्थानिकांनी सांगितले की, त्याची बायको त्याला मटण आणि दारूवर पैसे खर्च करू नको असे नेहमी सांगायची. तर त्याने बऱ्याचदा पत्नीला मारहाण देखील केली होती.

बिहारमध्ये घडलेली ही घटना पहिली नसून तेथील अररिया जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला मारहाण करून पेटवले होते. कारण काय होते तर तिने मटणात पुरेश्या प्रमाणात मीठ टाकले नव्हते.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य