Monday, 21 January 2019

केरळमध्ये गेल्या 100 वर्षांतील सर्वांत भीषण पूर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्ठा, नवी दिल्ली

केरळमध्ये पावसाने थैमान घातलं आहे, त्यामुळे गेल्या 100 वर्षांतील सर्वांत भीषण पुराशी केरळला सामना करावा लागत आहे. पुरातील बळींची संख्या 300 च्या वर गेली आहे.

केरळमध्ये पावसाचा जोर आणखी 2 दिवस कायम राहाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

केरळमधील काही जिल्ह्यामध्ये हा पाऊस कमी जास्त राहील पण 21 ऑगस्टपर्यंत परिस्थिती राहणार असल्याचे हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे.

केरळमधील हवेचा दाब कमी झाल्याने पाऊस जास्त झाला. पहिले तीन दिवस 100 मिलीमीटर पाऊस झाला. हवामानात अशा प्रकारचा बदल हा शतकांतून होत असतो, असे साबळे यांनी सांगितले.

8 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 
सरासरी 98.4 मिमी पडतो
यावेळी 349.7 मिमी पावसाची नोंद
 
16 ऑगस्ट
सरासरी 13.5 मिमी पडतो
यावेळी 137 मिमी पावसाची नोंद
 
17 ऑगस्ट
सरासरी 14.5 मिमी पडतो
यावेळी 76 मिमी पावसाची नोंद
 
केरळ पुरपरिस्थिती अपडेट
 • आतापर्यंत 324 लोकांचा मृत्यू
 • 82 हजार लोकांना वाचवण्यात यश
 • 2 लाख नागरिक विस्थापित
 • राज्यातील अनेक भाग पाण्याखाली
 • केरळच्या 13 जिल्ह्यात रेड अलर्ट
 • 80 धरणांचे दरवाजे उघडले
 • 22 लाख 31 हजार 139 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं
 • रेल्वे आणि हवाई सेवेला फटका
 • लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे मार्ग वळवले
 • कोची विमानतळ बंद
 • लष्कर, नौदल, हवाई दलाकडून दिवसरात्र बचावमोहिम सुरु
 • रेल्वेकडून दीड लाख पाण्याच्या बाटल्यांचे वाटप
 • नौदलाची आयएनएस दीपक युद्धनौका मुंबईहून कोचीला रवाना
 • 1300 लाईफ जॅकेट्स
 • 1000 रेन कोट्स
 • 1300 गम बुट्स
 • 1200 जेवणाचे डब्बे
 • 1500 खाण्याचे पॅकेट्स
 • 25 मोटर आणि 9 नॉन मोटर बोट्स
 • संरक्षण मंत्रालयाकडून केरळला मदत
 • दिल्ली, पंजाब, तेलंगणा राज्याकडून आर्थिक मदत
 • दिल्ली - 10 कोटी मदत
 • तेलगंणा - 25 कोटी मदत
 • आंध्रप्रदेश - 10 कोटी मदत
 • पंजाब - 10 कोटी मदत
 • केंद्र सरकारकडून 100 कोटींची मदत
 • भारतीय रेल्वेकडून आवश्यक वस्तूंचा पुरवठा
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य