Tuesday, 20 November 2018

पूरग्रस्त केरळला मोदींची अशी भेट...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

केरळमध्ये माजलेल्या पुराच्या हाहाकारात आतापर्यंत 324 बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच 2 लाखांहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री पिनराई विजयन, केंद्रीय मंत्री के. जे. अल्फान्स यांचाशी झालेल्या बैठकीमध्ये मोदी यांनी केरळला दिली 500 कोटींची तातडीची मदत जाहीर केली. याआधी 100 कोटींची मदत देण्यात आली होती. याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा केली. 

'केरळच्या जनतेला व्यापक मदत केंद्र पुरवित आहे, ज्यामुळे नागरिकांच्या जीवनात सामान्य स्थिती सुधारली जाईल.' असं ट्वीटही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य